वन हक्क कायदा

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008 आणि सुधारित नियम,2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना कलम 3(१) नुसार वैयक्तिक व सामुहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वन निवासी यांना स्वत:च्या उपजीविकेकरीता शेती कसण्यासाठी वन जमिनी धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा हक्क, निस्तार सारखे हक्क, गावाच्या सीमांतर्गत किंवा सीमेबाहेर पारंपारिकरित्या गोळा केले जाणारे गौण वनोत्पादन गोळा करणे, त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे यासाठी स्वामित्व हक्क, पाण्यामधील मत्स्य व अन्य उत्पादन, चराई करणे, पारंपारिक मोसमी साधन संपत्ती करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्त्रोताचे संरक्षण, पुनर्निमाण, संवर्धन, व्यवस्थापन करण्याचे हक्क इ. विविध वनहक्क प्राप्त झाले आहेत.

वन हक्क कायदा अधिनियम, 2006 नुसार वन हक्क दाव्यांचा तपशील

(फ्रेब्रुवारी, 2017 अखेर)
Sr. No Total claims Individual Claims % Community Claims %
1 Received 352989 11730
2 Disposed off 337833 95.71 8405 71.65
3 Approved 107806 6581
4 Rejected 230027 1824
5 Pending 15156 3325
Total IFR Approved (Original 107480 +appeals 40947) = 148427 claims (3.30 lakh acres of land)
Total CFR Approved (Original 6581 +appeals 02) = 6583 claims (21.09 lakh acres of land)
Total approved including Appeal (IFR +CFR) 155010 claims (24.40 lakh acres of forest land)
Total Titles distributed - 146043(IFR) +6036(CFR) = 152079
Land measurement 133586 Claims
7/12 extract districted 95756

सामाजिक जोडणी

© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.